जिल्हाप्रमुख - धुळे शहर व ग्रामीण तसेच साक्रीच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा गेल्या सहा वर्षांपासून सांभाळणारे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना बढती देत पक्षाने सहसंपर्कप्रमुखाची जबाबदारी दिली आहे. त्यांना शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघाची नवीन जबाबदारी सोपविली आहे. तर त्यांच्या जागी साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांचे पती डॉ. तुळशीराम गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांच्यावर धुळे शहर व ग्रामीण तसेच साक्री विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवत सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी हेमंत साळुंखे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेतील हे बदल जिल्ह्यातील राजकीय दिशा निश्चित करण्यासाठी मदत करतील, हे मात्र तेवढेच निश्चित आहे.
शिवसेनेत खांदेपालट, धुळे महानगरप्रमुखपदी सतीश महाले यांची पुन्हा एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST