शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:06 IST

Pooja Bagul dhule: धुळ्यातील एक भयंकर हत्याकांड राज्यात चर्चिले जात आहे. विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली. यात त्याचा प्रेयसीनेही हत्येसाठी पैसे दिले होते अशी माहिती समोर आली आहे. 

Pooja Bagul Murder case: प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील कपिल बागुल याने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेतली. त्यानंतर पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले. या हत्येसाठी मांत्रिकाला कपिलच्या प्रेयसीने ५० हजार दिले होते. स्वतः कपिल बागुलनेही पाच लाख रुपयांची सुपारी दिली. तपासातून ही माहिती समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वलवाडीतील साईशिल्प वक्रतुंड विहारमध्ये राहणाऱ्या सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागूल याने आपले प्रेमसंबंध माहिती पडले म्हणून पत्नी पुजा (वय ३८) हिचा पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन काटा काढला. ही घटना ३० मे रोजी घडली. 

याप्रकरणी पोलिसांनी खूनातील मुख्य आरोपी पती कपिलसह आई, वडील, बहीण आणि प्रेयसी अशा चौघांना अटक केली होती. शुक्रवारी एका विधीसंघर्षित मुलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मुलाचा दुसरा विवाह होण्यासाठी सासूचा त्रास

कपिल बागुल यांचे प्रज्ञा कार्डिले हिच्याशी प्रेम असल्याचे पत्नीसह सासु सासऱ्यांना माहित होते. परंतू पुजा हे मान्य नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. अशावेळी मुलगा कपिलचे लग्न प्रज्ञाशी व्हावे, यासाठी सासु विजया बागुल हि नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांनी पुजाशी भांडण करीत असल्याची बाब तपासात समोर आली.

पुजाला संपवण्याचा तांत्रिकाच्या घरी शिजला कट

लग्नात अडथडा ठरणाऱ्या पुजाला संपविण्यासाठी कपिल आणि त्याची आईने जादुटोणा करून पुजाच्या काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यासाठी दोघे भूषण बापू काळे या बोगस तांत्रिकाच्या घरी गेले होते. त्यावेळी पुजाला कायमचे संपविण्यासाठी तांत्रिकाच्या घरी प्लॅन तयार करण्यात आला होता. यात प्रेयसी प्रज्ञा देखील सहभागी होती.

सुनेला संपविण्यासाठी सासू मुलाकडे आग्रही

पूजा आणि सासू विजया यांच्या नेहमी वाद होत होते. त्यामुळे बागुल कुटूंबियांना पुजा नकोशी झाली होती. तर मुलाचे आवडीप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर दुसरे लग्न व्हावे, यासाठी सासु पुजाला कायमचे संपविण्यासाठी मुलाकडे आग्रही होती. यासाठी दोघांनी तांत्रिकाचा सल्ला घेतला होता.

पती व प्रेयसीकडून देण्यात आली रक्कम

पुजाला मारण्यासाठी भुषण काळेसह पाच जणांनी मदत केली. यासाठी प्रज्ञाने ५० हजार मांत्रिक भूषणच्या अकाउंटवर फोन पे ने पाठविले. तर कपिलने १ लाख रोखीने या सर्वांना दिले होते. संपूर्ण मदत करण्याकरिता पाच लाखांची रक्कम ठरली होती. 

वाचा >>पुजाऱ्याला फसवणाऱ्या महिलेचा कोकणातही प्रताप, बनावट सोने तारण ठेवून बँकेतून घेतले कर्ज

२९ तारखेला या सर्वांनी कपिलला पेस्टिसाइड इंजेक्शन घरी आणून दिले. त्यानंतर सर्वजण पुजाच्या मृत्यू होईपर्यंत वाट पाहत होते. यावेळी पूजाची सासू विजया बागूल हिने उपस्थितांना चहाचा आग्रह केला होता.

कपिलला कोणी केली मदत?

भुषण बापू काळे (२०), यश उर्फ जयेश अनिल जगताप (१९), सचिन उर्फ बब्या दौलत जाधव (३५) आणि विधीसंघर्षित मुलाचा समावेश आहे. तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने पुजाचा खून केल्याचे कबूल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळेPoliceपोलिसDeathमृत्यू