जावाई, मुलीचा छळ इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:27 IST2018-03-29T19:27:59+5:302018-03-29T19:27:59+5:30
पळासनेरची घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

जावाई, मुलीचा छळ इसमाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुलीने प्रेम विवाह केल्यानंतर मुलगी आणि जावायाने तक्रारी करण्याच्या धमकी देत हिस्सा मागितल्यामुळे शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे राहणारे प्रकाश भरतसिंग गिरासे (४४) यांनी मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली़
शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे राहणाºया संगिता प्रकाश गिरासे (३९) या महिलेने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ संगिता हिची मुलगी रुबल हिने शिरपूर तालुक्यातील अमोदे येथील योगेश विठ्ठल गिरासे याच्याशी प्रेम विवाह केला़ विवाहानंतर योगेश आणि रुबल या दोघांनी प्रकाश भरतसिंग गिरासे यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागितले़ यासोबत त्यांनी हिस्साही मागितला़ प्रकाश गिरासे हे मुलगी रुबल आणि जावाई योगेश यांना दाद देत नव्हते़ त्यामुळे या दोघांनी खोट्या तक्रारी करण्याची धमकी दिली़ मुलगी आणि जावाई यांच्या छळाला कंटाळून प्रकाश गिरासे यांनी मंगळवारी सकाळी १० वाजेपुर्वी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़
याप्रकरणी संगिता प्रकाश गिरासे या महिलेने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक वाय़ जे़ ढिकले करीत आहेत़