शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

बाधित पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:16 IST

शिरपूर : जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले स्वागत, आतापर्यंत ५९ रूग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात आतापर्यंत कोरोनाचे १२० रूग्ण आढळून आले आहेत़ त्यापैकी १५ जणांचा मृत्यु तर ५९ रूग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत़ दरम्यान, १७ रोजी देखील येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोनामुक्त पोलिस कर्मचाऱ्याचा डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या पोलीस कर्मचाºयाचे स्वागत जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी केले़तालुक्यात आतापर्यंत १२० कोरोना बाधित झाले असून त्यात ग्रामीण भागातील १० तर उर्वरीत ११० शहरातील रूग्ण आहेत़ १६ रोजी देखील संध्याकाळी आलेल्या अहवालात येथील उपजिल्हा रूग्णालयात १५ पैकी ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे़ त्यात आऱसी़ पटेल कॉलनीतील ४० वर्षीय पुरूष, कुंभारटेक येथील ५८ वर्षीय पुरूष, वरवाडे भागातील ६० वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महिला, पाटीलवाड्यातील ४८ वर्षीय महिला तर करवंद येथील ११ वर्षीय मुलगा व १५ वर्षीय मुलगी असे ७ जण बाधित आढळून आले आहेत़ हे दोघे बालक गेल्या ४ दिवसापूर्वी करवंद येथील बाधित असलेले पती-पत्नी यांचे मुले आहेत़कोरोनाने गेल्या आठवड्यापासून वरवाडे परिसरात शिरकाव केल्याने म्हळसामाता परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून दुकाने १७ व १८ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेवून या भागातून कोरोनाला हद्दपार करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे म्हाळसामाता परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत़१७ रोजी येथील उपजिल्हा रूग्णालयातील २ कोरोना बाधित रूग्णांना डिस्चार्ज करून घरी सोडण्यात आले़ त्यात अंबिका नगरातील वृध्द पुरूष तर नाथनगरीतील रहिवाशी असलेला पोलिस दलातील कर्मचाºयाचा समावेश आहे़यावेळी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़धु्रवराज वाघ, डॉक़पील पाटील, डॉ़मोहज्जीन खान, डॉ़योगेश अहिरे, डॉ़अमोल जैन, डॉ़महेंद्र साळुंखे, डॉ़शालीग्राम नेरकर, के़झेड़ पगार, सावता माळी, भगवान बोरसे, मसुदअली सैय्यद, बेबी गावीत, विजया शिरसाठ, खलाणे, खंडेराव ईशी, विनोद निकम, भूषण गवळी, कढरे यांच्यासह आरोग्य पथकाने टाळ्या वाजवून स्वागत केले़ दरम्यान, रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे