आयुक्तांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:13 IST2019-09-25T23:12:50+5:302019-09-25T23:13:06+5:30
महापालिका: अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लिफ्टची स्वतंत्र व्यवस्था

dhule
धुळे : महापालिकेच्या नव्या इमारतीत दोन लिफ्ट बसविण्यात आले आहे़ या लिफ्टचे मंगळवारी आयुक्त अजिज शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महापालिकेच्या नवीन इमारतीत बांधण्यात आली आहे. नागरिकांना जाण्यासाठी- येणाºयासाठी दोन लिफ्टची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे़ मात्र इमारतीच्या लोकार्पणानंतर बºयाच महिन्यानंतर या लिफ्टचे उदघाटन मंंगळवारी ाुंबई येथील कार्यालयातून परवानगी मिळाल्यानंतर आयुक्त अजिज शेख यांच्या हस्ते उदघाटन झाले़
या वेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, कार्यालयीन अधीक्षक नारायण सोनार, नगररचनाकार महेंद्र परदेशी, अभियंता नरेद्र बागुल, विजय सनेर, मनोज वाघ, पी. डी. चव्हाण,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
लिफ्टचा आंनद घेतला
बºयाच महिन्याच्या प्रतिक्षनंतर मंगळवारी लिफ्टचे उदघाटन झाले़ त्यावेळी अधिकाऱ्यांनी पेठे वाटून लिफ्टमध्ये आंनद साजरा केला़ आयुक्त शेख यांनी फित कापून कर्मचाºयासोबत लिफ्टचा वापर केला़ इमारतीत दोन लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहे. त्यातील एक अधिकाºयांसाठी तर दुसरी कर्मचारी व नागरिकांसाठी असेल. एका लिफ्टची क्षमता ६८० किलो वजन वाहून नेण्याची आहे. लिफ्टची तीन वषार्ची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनीकडे असेल. एक महिना कंपनीचा कर्मचारी लिफ्ट चालविण्यासाठी असेल.