एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; धुळ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 23:49 IST2022-02-21T23:49:20+5:302022-02-21T23:49:33+5:30
अवधान शिवारातील घटना; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू

एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; धुळ्यातील घटना
धुळे: एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शहरानजीक अवधान गावातील दौलत नगरात सोमवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. सर्वांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील गणेश गोपाळ (४२) हे धुळे एमआयडीसीत कामाला आहेत. अवधान येथे दौलत नगरात ते परिवारास वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी स्वत: गणेश गोपाळ, पत्नी सविता गोपाळ (३५), मुलगी जयश्री गोपाळ (१४), मुलगा गोविंदा गोपाळ (१२) आणि भारत पारधी (२४) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शेजारी लोकांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांना कळविले. मोहाडी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाचही जणांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.