शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

विविध कसोट्यांमुळे ईव्हीएम मशिनमध्ये खोटे करणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 12:01 IST

राष्टÑीय मतदार दिन । अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : १८ वर्षानंतरच तरूणाईच्या हातात लोकशाहीची सुत्रे येणार आहेत़ विशेषत: तरूणाईच्या हातातील मोबाईलमध्ये सारखं बिंबवलं जात की, ईव्हीएम मशिन हे खोटं आहे, चुकीचे आहे़ मात्र, ईव्हीएम मशिन हे १०० टक्के स्वच्छ, खरे आहे़ या मशिनला इतक्या कसोट्या लावल्या आहेत की, त्यामध्ये खोटं करणे या पातळीवर शक्य नाही, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले़२५ रोजी येथील अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय १०वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आरसीपी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल, तहसिलदार आबा महाजन, न.पा. सीईओ अमोल बागुल, पटेल संस्थेचे सीईओ डॉ़उमेश शर्मा, नायब तहसिलदार गणेश आढारी, सुदाम चौरे, सहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, प्राचार्य दिनेश राणा, उपप्राचार्या अनिता थॉमस, पी़झेड़ रणदिवे, केक़ेख़ैरणार, ढोले, डॉ़महेंद्र पाटील आदी उपस्थित होते़उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे म्हणाले, भारतीय नागरीक चित्रपट पाहण्यासाठी ३ तास देतात, किक्रेट पाहण्यासाठी दिवसभर वेळ देतात अन् राजकारणाची चर्चा करतांना तर आपण कधीही दमत नाही़ मात्र मतदान करण्यासाठी आपण साधे १० मिनीटे सुध्दा देवू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे़ तहसिलदार आबा महाजन म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान या तालुक्यात होत असून ही गौरवास्पद बाब आहे़सुरूवातीला शहरातील सर्व शाळांनी जनजागृती रॅली काढली़ कार्यक्रमस्थळी मतदान जागृतीसाठी रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली़ सांगवी शाळेतील मुलींनी आदिवासी नृत्य सादर करून दाद मिळविली़ जि़प़शिक्षकांच्या कला पथकाने देखील मतदान जनजागृती नाटीका सादर केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी पी़झेड़ रणदिवे यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे