मालवाहू रिक्षा-दुचाकी अपघातात पती ठार; नंदुरबार चौफुलीवरील घटना, पत्नीसह तिघे जखमी
By देवेंद्र पाठक | Updated: July 17, 2023 18:04 IST2023-07-17T18:04:08+5:302023-07-17T18:04:24+5:30
दोंडाईचा नजिक नंदुरबार चौफुलीवर भरधाव रिक्षा आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला.

मालवाहू रिक्षा-दुचाकी अपघातात पती ठार; नंदुरबार चौफुलीवरील घटना, पत्नीसह तिघे जखमी
धुळे: दोंडाईचा नजिक नंदुरबार चौफुलीवर भरधाव रिक्षा आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची पत्नी आणि दोन मुली असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दोंडाईचाकडून नंदुरबार रस्त्यावर शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावापासून दोन कि.मी. अंतरावर पोल्ट्री फाॅर्मवरच्या समोर दुचाकी आणि मालवाहू पिकअप यांची धडक झाली.
अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. नंदुरबारकडून येणारी पिकअप व्हॅनने दुचाकीला ओव्हरटेक करताना धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. त्यात देवनाथ अमृत सपकाळे (वय ४५), त्यांची पत्नी वंदना देवनाथ सपकाळे, मोठी मुलगी परशनी दिगंबर अहिरे, लहान मुलगी गीता देवनाथ सपकाळे या चौघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापुर्वीच देवनाथ सपकाळे यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.