शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कट्यार फिरवत निर्माण केली दहशत!

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

लग्न सोहळ्यात आलेल्या एका पाहुण्याने आनंदाच्या भरात चांगलीच दारू रिचवली. मात्र, दारूची झिंग चढल्यानंतर सहकार्‍यांसोबत झालेल्या वादात त्याने चक्क नवरदेवाची 'कट्यार' हाती घेऊन दहशत निर्माण के

नगावबारी : दारूच्या नशेत एकाचे कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

धुळे : लग्न सोहळ्यात आलेल्या एका पाहुण्याने आनंदाच्या भरात चांगलीच दारू रिचवली. मात्र, दारूची झिंग चढल्यानंतर सहकार्‍यांसोबत झालेल्या वादात त्याने चक्क नवरदेवाची 'कट्यार' हाती घेऊन दहशत निर्माण केली. शेवटी देवपूर पोलिसांनी या महाभागास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या दारूची नशा उतरली.नगावबारी परिसरात गुरुवारी एक लग्न सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका पाहुण्याने सहकार्‍यांसोबत मनसोक्त मद्यप्राशन केले. मात्र, त्यानंतर भलताच प्रकार घडला. दारूच्या नशेत तर्र् झालेल्या या पाहुण्याची सहकार्‍यांसोबत वादावादी झाली. त्यात ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. संतापलेला पाहुणा तर नवरदेवाची कट्यार हातात घेऊन सहकार्‍यांच्या मागे धावत सुटला. नगावबारी चौफुलीवर असलेल्या उड्डानपुलापर्यंत या पाहुण्याने सहकार्‍यांचा पाठलाग केला. मात्र, ते निसटल्याने त्याचा संताप अनावर झाला. त्याने हातातील कट्यार येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांच्या अंगावर मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत दूरध्वनीवरून काहींनी देवपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसी खाक्या दाखवताच त्या पाहुण्याची दारू उतरली. मात्र, रात्रीउशिरापर्यंत या प्रकाराबाबत देवपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. भीतीचे वातावरण... कट्यार हातात घेऊन शिवीगाळ करत नगावबारी उड्डाण पुलाजवळ आलेल्या या पाहुण्याचा रूद्रावतार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वाहनधारकांना या महाभागाने अडवले. मात्र तो दारूच्या नशेत असल्याने वाहनधारकांनी त्याकडे दुर्लक्ष करत तेथून पुढे जाणे पसंत केले. या घटनेची एकच चर्चा होत होती.