शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उच्चशिक्षित समाज आई-वडील सांभाळण्यात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 11:16 PM

निराधारांसाठी आधार ‘मातोश्री वृध्दाश्रम’

ठळक मुद्देआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठउच्चशिक्षित समाज अपयशीवृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्थाआजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

चंद्रकांत सोनार ।आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून मुलांसाठी रक्ताचे पाणी करतो़ केवळ मुलांनी आई-वडीलांचा सांभाळ करावा म्हणून, आज गरीब मुलाकडून सांभाळ होतो़ मात्र उच्चशिक्षित समाज आजही आई-वडील सांभाळण्यास अपयशी ठरत असल्याचे मत मातोश्री वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले़प्रश्न : मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना केव्हा व नेमके उद्देश काय आहे ?उत्तर : नकाणे तलाव परिसरात मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना ५ सप्टेंबर १९९८ रोजी झाली़ सुरूवातीला अनुदान मिळत होते़ त्यानंतर अनुदानात बंद झाल्यानंतर दानशुर व्यक्तीच्या मदतीने वृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्था होत आहे़प्रश्न : मुल, सुना नांतवड असा परिवार असतांना ही निराधार होण्याची का वेळ येतेउत्तर : या वृध्दाश्रमात ३७ निराधार जोडपी आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ शेवटी पैशावरून वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने कौटूंबिक वाद होतात़ म्हणून निराधार होण्याची वेळ येते़प्रश्न : आजपर्यत किती निराधारावर अंत्यसंस्कार वृध्दाश्रमाकडून झालाउत्तर : या वृध्दाश्रमात मुख्याध्यापक, शिक्षिका, रेल्वे पोलिस, क्रिकेटपटू, कलावंत, अशा उच्चपदाच्या अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतरचा काळ वृध्दाश्रमात काढला आहे़ येथील सर्वच वृध्द निराधार नाहीत़ तर ज्यांना मुल, सुना, मुलगी, जावाई, नातवंडे, नातू असा परिवार असतांनाही वृध्दाश्रमात राहण्याची वेळ आली आहे़ आई-वडीलांचे अंतिम दर्शन घेण्यास देखील मुलं नकार देतात़ त्यामुळे आजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे़आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव लक्षात येतो़उच्चशिक्षित समाज अपयशीरक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेत्यात ज्या आई-वडीलाचे महत्वाचा वाटा असतो़ त्याच उच्चशिक्षित समाजाकडून आई-वडीलांचा सांभाळ करता येत नाही़ सर्वकाही असतांना वृध्दाश्रमात आयुष्य काढावे लागते़

टॅग्स :Dhuleधुळे