ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडी युवा संस्थेला ‘जिल्हा युवा मंडळ’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST2021-03-01T04:42:13+5:302021-03-01T04:42:13+5:30

धुळे : नेहरु युवा केंद्र, धुळे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार या विभागामार्फत दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ...

Gyandeep Pratishthan Biladi Yuva Sanstha announces 'Zilla Yuva Mandal' award | ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडी युवा संस्थेला ‘जिल्हा युवा मंडळ’ पुरस्कार जाहीर

ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडी युवा संस्थेला ‘जिल्हा युवा मंडळ’ पुरस्कार जाहीर

धुळे : नेहरु युवा केंद्र, धुळे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार या विभागामार्फत दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा-युवती मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात या पुरस्कारासाठी ४ संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीव्दारे छाननी करुन प्राप्त प्रस्तावातून ज्ञानदीप प्रतिष्ठान, बिलाडी या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे. ज्ञानदीप प्रतिष्ठान, बिलाडी या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात तंबाखूमुक्ती, कोरोना जनजागृती, स्वच्छता अभियान, क्रीडा, फिट इंडिया मुव्हमेंट, सांस्कृतिक जलजागृती व्यवसाय प्रशिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल संस्थेला जिल्हा नेहरु युवा केंद्र, धुळे कार्यालयाच्यावतीने ‘जिल्हा युवा मंडळ’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Gyandeep Pratishthan Biladi Yuva Sanstha announces 'Zilla Yuva Mandal' award