भाजपचे जिल्हा सरचिटणीस डी.एस. गिरासे यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे : धमाणे, बाह्मणे, लंघाणे, नवे कोळदे, जुने कोळदे, कुंभारे, रंजाणे, जसाणे, हिसपूर, तावखेडा प्र.न. , झोतवाडे, मंदाणे, विरदेल, चौगाव बु., हुंबर्डे, दत्ताणे, दसवेल, टेमलाय, निरगुडी, सुकवद, बेटावद, मुडावद, अजंदे बु, डाबली, धांदरणे, निशाणे, महाळपूर, बाभुळदे, रहिमपुरे, विखुर्ले, हातनूर, अलाणे, सोनशेलू, कामपूर, सुराय, झिरवे, धावडे, दिवी, रेवाडी, कर्ले, परसुळे, सवाई मुकटी, जखाणे, अमराळे, तामथरे, वायपूर, चिमठावळ सुराय.
कॉंग्रेस व शिवसेनेने दावा केलेल्या ग्रामपंचायती - काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बेटावद, सोनशेलू, सार्वे, सोनेवाडी, खलाणे, लोहगाव, दलवाडे, दरखेडा, डांगुर्णे, अजंदे बु., जातोडा, वरूळ, महाळपूर, दसवेल, चौगावा, हुंबर्डे मेलाणे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी पढावद, डाबली, देवी महाळपूर, दसवेल, जातोडा, अक्कडसे, खलाणे, डांगुर्णे, धावडे या ग्रामपंचायतीत विजयाचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी - तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेहरे यांनी दावा केलेल्या विरदेल, सोनेवाडी, खलाणे, दलवाडे, वरूळ, घुसरे, दरखेडा, सोनशेलू, बेटावद, डांगुर्णे, जातोडे, पढावद, सार्वे, बाभुळदे, मुडावद, जखाणे, दसवेल, डाबली ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर बेटावद येथे १७ जागांपैकी भाजपचे सात, काँग्रेसचे सात तर बिनविरोध तीन निवडून आले आहेत. त्यात भाजप व काँग्रेस दोन्हींनी दावा केला असून, बिनविरोध जिकडे जातील त्यांची सत्ता बसणार आहे.