धान्य पुरवठ्याची चौकशी करण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:03+5:302021-02-27T04:48:03+5:30

मालपूर (ता. शिंदखेडा)येथे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तीन स्वस्त धान्य दुकाने आहेत. यात दोन दुकाने एकाच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले ...

Grain supply should be investigated | धान्य पुरवठ्याची चौकशी करण्यात यावी

धान्य पुरवठ्याची चौकशी करण्यात यावी

Next

मालपूर (ता. शिंदखेडा)येथे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तीन स्वस्त धान्य दुकाने आहेत. यात दोन दुकाने एकाच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले चौकात हिंग्लाजदेवी ग्राहक सोसायटी च्या माध्यमातून चालवली जात आहे तर एक, वीर एकलव्य पुतळ्याजवळ महिला बचत गटांकडे आहे.

येथील दुकानात वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा स्थानिक दक्षता समितीच्यावतीने पंचनामा करण्यात आला. यावेळी पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या धान्याच्या गोण्या वजन काट्यावर ठेवण्यात आल्यावर ५० किलोच्या गोणीमागे दीड ते दोन किलो धान्य कमी भरत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. हे कमी आलेले धान्य दुकानदार घटच्या नावाने ग्राहकांनादेखील कमी देत असल्यामुळे येथील लाभार्थीना हक्काचे धान्य कमी मिळत असल्याचा प्रकार उघड झाला.

या संदर्भात सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी बैठकीतूनच तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता जुन्या थप्पीमधील गोण्या कमी वजनाच्या असल्याचे कबूल केले. यासाठी पुरवठा विभागाने मालपूर येथे भेट देऊन चौकशी करून लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य द्यावे, अशी उपस्थितांनी मागणी केली. बैठकीला लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे उपसरपंच तुकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, अरुण धनगर, कैलास माळी, बापू शिंदे, जगदीश खंडेराव, उत्तम भामरे आदी उपस्थित होते.

चौकट....... मालपूरला दोन वर्षे झाली तरी अद्याप दक्षता समिती गठीत केलेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित होणाऱ्या मालावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती असून ती ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित गठीत करावी.

Web Title: Grain supply should be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.