शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा पाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

सरकारी रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) राज्यात व राज्याबाहेर विविध केंद्रांवर घेण्यात येत असतात. अनेक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ ...

सरकारी रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) राज्यात व राज्याबाहेर विविध केंद्रांवर घेण्यात येत असतात. अनेक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होत असतात. मात्र, राज्यातील कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा ही परीक्षा होणार नाही.

क्रीडा क्षेत्रासोबतच चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्याच्या प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने दहावीच्या परीक्षेमध्ये अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय २०१७ रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होत हाेता. मात्र, यावर्षी परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणे अवघड झालेले आहे. कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांची गुणाबाबतची धास्ती वाढलेली असताना त्यांच्या हक्काच्या सवलतीच्या गुणांवर गदा आणणे हा विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे अनेक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा.

कला संचालकांची कला शाखेच्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. म्हणून त्यांनी कला गुण देऊ नये असे तंत्रशिक्षण विभागाला खोटी माहिती दिली. त्यामुळेच कलागुण देऊ नये असा अध्यादेश निघाला.

- प्रल्हाद साळुंके,,

प्रदेश सरचिटणीस, कला शिक्षक महासंघ.

कला संचालकांचा आठमुठेपणा हा कला क्षेत्र व कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना घातक ठरत आहे. एलिमेंटरी, इंटरमीजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना कलागुण देण्यात येऊ नये हा चुकीचा निर्णय आहे.

- सुनील महाले,

ज्येष्ठ सल्लागार, कला शिक्षक महासंघ.

कला गुणांचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. शासनाने परीक्षा तोंडावर आलेली असताना कलागुण न देण्याचा निर्णय घेतला. तो चुकीचा आहे.

- शरद पाटील

विद्यार्थी हिताचा विचार करून शासनाने हा निर्णय रद्द करावा. तसेच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. चुकीचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये.

- सोनाली शिंदे.