शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांसाठी ‘धुळे’ शुभशकून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:55 IST

धुळे : दिग्गजांच्या सभेतून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

- राजेंद्र शर्मागेल्या १५ दिवसात भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर काँग्रेसतर्फे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी या दोन दिग्गज नेत्यांनी महाराष्टÑात धुळ्यात पहिली सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. दोन्ही सभा मोठ्या आणि ‘रेकार्ड ब्रेक’ झाल्यात. कोणाची सभा मोठी झाली, यासंदर्भात राजकीय नेत्यांकडून दावे - प्रतिदावे होतील आणि सुरुच राहतील. परंतू या दोन्ही सभांमुळे देशातील दोन प्रमुख पक्षांच्या दृष्टीकोणातून ‘धुळे ’ हे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती  आली. या दोन्ही सभांमुळे धुळेकर जनतेला राजकीय विचारांची चांगली मेजवाणी मिळाली. भाजपच्या दृष्टीकोणातून विचार केला तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे केंद्रात धुळ्याचे प्रतिनिधीत्व करतात. डॉ.भामरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील आतंकी हल्याच्या घटनेनंतर लगेच दोन दिवसातच ही सभा होती. त्यामुळे ती रद्द होण्याची चर्चा होती. परंतु ती चर्चा फोल ठरवित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात येऊन धुळेकरांचे स्वप्न असलेल्या मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गाच्या कामात पहिल्या टप्प्यात होणाºया धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच सुलवाडे - जामफळ - कनोली या सिंचन योजनेसहीत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. या सभेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दृष्टीकोणातून धुळे लोकसभा मतदारसंघाचे किती महत्व आहे, हे स्पष्ट केले. सोबतच मतदारसंघातील भाजप उमेदवारासंदर्भात सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम देत लोकसभा निवडणूक प्रचाराचा  शुभारंभ केला. सभेला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. या सभेमुळे भाजपच्या दृष्टीकोणातून धुळे मतदारसंघ किती महत्वाचा आहे, हे स्पष्ट झाले.काँग्रेसने देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर अवघ्या १५ दिवसाच्या आत २ मार्चला पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांची धुळयात प्रचार सभा आयोजित केली. या सभेला काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खान्देशातील पक्षाचे प्रमुख नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव ठाकरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह आजी, माजी मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसने देखील भाजप प्रमाणेच महाराष्टÑात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ धुळ्यातूनच केला. सभेत पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष व खासदार राहूल गांधी यांनीही धुळ्याचा उल्लेख आपल्या भाषणातून करीत पक्षाच्या दृष्टीकोणातून धुळ्याचे महत्व किती आहे, हे स्पष्ट केले. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी देखील आपल्या भाषणातून धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाच्या परंपरेचा उल्लेख केला व त्यामुळेच पक्षाने धुळ्यातून प्रचाराचा शुभारंभ केल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा उल्लेख करीत पक्षातर्फे त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. तसेच याआधीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत धुळे लोकसभेसाठी रोहिदास पाटील यांचेच नाव पाठविल्याचे स्पष्ट केले आहे.धुळ्यातील या दोन्ही सभांमुळे काँग्रेस - भाजप पक्षाच्या नेते मंडळींच्या दृष्टीने ‘धुळे’ लोकसभा मतदारसंघाची जागा ही किती महत्वाची व प्रतिष्ठेची आहे, हे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या दृष्टीकोणातून गेल्या १० वर्षापासून मतदारसंघात असलेली सत्ता अबाधित ठेवायाची आहे. तर काँग्रेसला १० वर्षापूर्वीची धुळ्याची काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याची ओळख परत मिळवायची आहे. तसेच येथूनच दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी राज्यातील  आपल्या प्रचाराची सुरुवात केल्याने मतदारसंघातील निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे आता देशासह संपूर्ण राज्याचेच लक्ष धुळे मतदारसंघाकडे लागल्याने याठिकाणी लोकसभा निवडणुकीची होणारी लढत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे, हे त्यावरुन स्पष्ट झाले आहे. एरव्ही खून, दंगलीसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘धुळे’ आता लोकसभा निवडणुकीमुळे राजकारणातही अव्वल असल्याचा आनंद आहे. मात्र, जसे राजकारण्यांच्या दृष्टीने प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ‘धुळे’ शुभशकुन ठरतो, तसेच धुळ्याच्या सर्वांगिण विकासासाठीही हा ‘शुभशकुन’ ठरावा, अशी धुळेकरांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे