शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:34 IST2019-11-26T21:34:14+5:302019-11-26T21:34:50+5:30

मागणी : शिवसेना पदाधिकाऱ्यांचे धुळे तालुका तहसिलदारांना निवेदन

Give the benefit of PM's Honor Scheme to farmers | शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ द्या

Dhule

धुळे : राज्यासह जिल्हयात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने सर्वत्र ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे़ प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकºयांना ओला दुष्काळाचे हेक्टरी २५ हजार अनुदान तसेच पिक विमा व प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ मिळवुन द्यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेनेकडून करण्यात आली़
अतिवृष्टी व अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकºयांचा संपूर्ण शेती, बाजरी, ज्वारी, मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ निसर्गाने शेतकºयांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे़ त्यामुळे शेतीच्या उत्पन्न व जनावरांचा चाराचे नुकसान झाले आहे़ अशा परिस्थितीत राज्यपालांनी नुकतेच आठ हजार रूपये हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे़ आठ हजार रूपयामध्ये कुठलीच नुकसान भरपाई निघणारी नाही़ राज्यापालांनी तुटपुंजे अनुदान जाहीर करून शेतकरी बांधवांची थट्टा केलेली आहे़
राज्यपालांनी कमीत कमी २५ हजार रूपये अनुदान जाहीर केल्यास शेतकºयांना रब्बी हंगामासाठी फायदा होऊ शकतो़
पिकविमा कंपनीकडून शेतकºयांना पिकविमा देण्यासाठी उपाय-योजना कराव्यात, प्रधानमंत्री सन्मान योजना जाहीर केलेल्या योजनेतून शेतकºयांना पहिला व दुसरा हप्ता मिळालेला नाही़ त्यामुळे शेतकरी पिकविमा योजनेपासून वंचित आहे़ शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये हप्ता तसेच पिकविमा योजनेचे लाभ तत्काळ द्यावा, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे़ निवेदनावर शिवसेने जिल्हाप्रमुख हिलाल माळी, चंद्रकांत म्हस्के, प्रविण पाटील, बादलसिंग राजपूत, सुधाकर पाटील, गुलाबराव धोबी, हेमराज पाटील, आंनदा पारखे, किशोर आढाव, मंगलसिंग गिरासे, भगवान भदाणे आदीच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Give the benefit of PM's Honor Scheme to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे