शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

रेकीकरुन कापूस व्यापाऱ्याला लुटणारे चौघे जबरीचोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:05 IST

एलसीबी : तामसवाडीजवळील थरार, १४ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त

धुळे : कापूस विक्री केल्यानंतर आलेले १३ लाख ५४ हजार रुपये दुचाकीवरुन एकटे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून खाली पाडून पैशांची जबरी चोरी करणाऱ्या चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुसक्या आवळल्या. चौकशीअंती त्यांनी रेकी करुन हे कारस्थान केल्याचे मान्य केले. ही घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील संदिप शिवाजी पाटील हे कपाशीचे व्यापारी आहेत. धुळ्यात त्यांनी आपला कापूस विक्री केल्यानंतर १३ लाख ५४ हजार रुपये घेऊन एकटेच ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास मांडळ या त्यांच्या गावी निघाले होते. धुळे तालुक्यातील कौठळ - तामसवाडी रोडवर त्यांच्या दुचाकीला लाथ मारुन त्यांना खाली पाडण्यात आले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम तिघांनी बरजबरीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२ जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.सोनगीर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास सुरु असतानाच धुळ्यातील गल्ली नंबर ५ मधील चड्डा उर्फ देवेंद्र पांडूरंग गायकवाड याच्या सांगण्यावरुन तिघांनी हे कारस्थान केल्याचे समोर आले. सुरुवातीला चड्डा उर्फ देवेंद्र याला ताब्यात घेवून त्याची चौकशी करण्यात आली. जबरी चोरी करणारे त्याचे साथीदार राहुल दिलीप परदेशी (रा. गल्ली नंबर ६, चैनी रोड, धुळे), आकाश एकनाथ दाभाडे (रा. पश्चिम हुडको, पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि अभिजीत भरतसिंग राजपूत (रा. मळाणे ता. धुळे) या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी रेकी कशी केली, लूट करीत पैसे कसे लंपास केले याची माहिती पोलिसांना देत गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १३ लाख ३२ हजार रुपये, ८० हजाराचा दोन दुचाकी असा १४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Dhuleधुळे