शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नकाणे झाला ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:52 PM

महापालिका । पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर, शहराचा पाणी प्रश्न सुटणार

धुळे : शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस सुरु आहे़ दमदार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडले जात आहे़ शनिवारी सकाळी १० वाजेनंतर अक्कलपाडा धरणातून तब्बल १० हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे़ त्यामुळे पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे़ नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे़ सुरक्षितता म्हणून गणपती मंदिराजवळ पोलीसही तैनात करण्यात आले़जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १३९ टक्के पाऊस झालेला आहे़ जिल्ह्यातील चारही तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे़ साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात तर पावसाची संततधार सुरुच आहे़ आमळी, पिंपळनेर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मालनगाव, जामखेली, लाटीपाडा ही धरणे शंभर टक्के भरुन वाहत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली आहे़ सकाळी १० वाजेच्या सुमारास पांझरा नदीपात्रात प्रति सेकंद १० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे़ गेल्या दोन दिवसांपुर्वी देखील अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़पांझरा नदीपात्रात प्रति सेकंद १० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे़ गेल्या दोन दिवसांपुर्वी देखील अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे