शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य चोरीप्रकरणी ट्रकसह पाच ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:43 IST

रस्त्यातच धान्य हडप : शहर पोलिसात तक्रार

धुळे : जळगावहून मुंबई येथे वाहतूक करण्यासाठी दिलेले कडधान्य रस्त्यातच हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे़जळगाव येथून १७ जून रोजी एमएच १९ झेड २५१६ या ट्रकमधून जळगाव येथील भापसे अण्णा ट्रान्सपोर्ट येथून मुगडाळ, उडीदडाळ आणि चवळी या कडधान्याच्या ३९६ गोण्या (कट्टे) हे वाशी (नवी मुंबई) येथील विविध व्यापाऱ्यांकडे पोहच करण्यासाठी दिले होते़ १७ जून रोजी रात्री ११ ते १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान एरंडोल ते धुळे येथील सुरत बायपास रस्त्यावर यातील ७९ गोण्या गहाळ झाल्या होत्या़ याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ट्रकमालक जाबाज खान यांनी १९ जून रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ट्रक चालक विकास चौधरी आणि सहचालक गुरुदास धनगर यांच्या विरोधात भादंवि कलम ४०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे यांच्याकडे सोपविण्यात आला़ त्यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि ट्रकसह चालक आणि सहचालक या दोघांसह तीन असे एकूण पाच जणांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे़ त्यांची चौकशी सुरु आहे़दरम्यान, ट्रक आणि काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ त्यांची चौकशी सुरु असून लवकरच अधिक माहिती देण्यात येईल़ अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़

टॅग्स :Dhuleधुळे