शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:02 IST

पाटण ग्रामपंचायत : वैयक्तिक घरकुल योजनेत अनियमिततेची तक्रार

शिंदखेडा : अखेर पाटण ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी पाटण गावातील घरकुलात दुबार लाभ देऊन अनियमितता केली असल्याची फिर्याद शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी शिंदखेडा पोलिसात दिली आहे. त्यावरुन शिंदखेडा पोलिसात तत्कालीन सरपंच विशाल पवार व तत्कालीन ग्रामसेवक रामकृष्ण राजपूत यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.पाटण येथील घरकुल व वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, त्याची कोणीच दखल न घेतल्याने उपसरपंचासह गावातील ७ नागरिकांनी १६ ते २७ मार्च दरम्यान बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, प्रशासनाने ९ एप्रिलपर्यंत वेळ मागितल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले होते. प्रशासनाने मागितलेली मुदत संपल्यानंतरही कोणतीच कारवाई न केल्याने उपसरपंचासह ४ जणांनी १० एप्रिलपासून पुन्हा उपोषणास प्रारंभ केला होता. त्यामुळे अखेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी शिंदखेडा पोलिसात पाटण येथील तत्कालीन सरपंच विशाल सुभाष पवार व तत्कालीन ग्रामसेवक रामकृष्ण मोहनसिंग राजपूत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, सन २००४-०५ मध्ये गावातील नावजी श्रीपत भिल यांना १२ हजार रुपये घर दुरुस्तीचा लाभ दिला असतांना त्यांना परत सन २०१६-१७ मध्ये १ लाख २० हजार रुपये घरकुलाचा दुबार लाभ तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात देऊन अनियमितता केली आहे व शासनाची फसवणूक केलेली आहे.याबाबत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून त्यात अहवालात मुद्दा क्र २ मधील अ.क्र. १, ३, ४, ५, ६ यांच्या नावासमोर सर्वेमध्ये हो, असे दाखवले असतांना त्यांच्या मुलांनाही शौचालयाचा लाभ त्यांचे नमुना नंबर ८ला नाव नसतांना देण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यार गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी तिसºया दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे