नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:34+5:302021-02-10T04:36:34+5:30
जानेवारी महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा दादर मका फळपिके भाजीपाला पिकांचे प्रचंड मोठे नुकसान ...

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
जानेवारी महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा दादर मका फळपिके भाजीपाला पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कापडणे गावातदेखील पाऊस झाला होता. त्यामुळे धनुर लोणकुटे कापडणे शिवारात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सदर पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी गौरव चौधरी, धुळे जिल्हा कृषी सभापती बापू खलाणे, विजय बेहरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कापडणे येथील दीपक वसंत पाटील, मच्छींद्र वसंत पाटील यांच्यासह असंख्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. व पंचनामेदेखील केले. झालेल्या नुकसानाची शासन स्तरावरून भरपाई मिळावी, अशी मागणी कापडणे गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची होत आहे.
गेल्या महिन्यात धुळे तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे अशा नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची प्रतिक्रिया धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी दिलेली आहे.