शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मालाची स्वत:विक्री करून शेतकरी आत्मनिर्भर झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:00 IST

शिंदखेडा : तीन महिन्याच्या कालावधीत झाली तब्बल ६४ कोटी रूपयांची उलाढाल, कृषी विभागाचे मिळाली मदत

शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल भाजीपाला,सिमला मिरची, काकडी, ढेमसे, शेवगा, टमाटे,मेथी, मुळा, बिट,मिरची, पपई, कलिंगड,पेरू, डांगर,आदी शेतमाल शेजारच्या राज्यातील इंदूर, सुरत, व मुबंई येथिल बाजारपेठेत विक्रीस नेला. मात्र कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंदीमुळे त्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करता आला नाही. सुरवातीस शेतकऱ्यांनी हा शेतीमाल तालुक्यात व शहरात अल्प दारात वाटप केला. उर्वरित गुरांना चारा म्हणून खाऊ घातला. शेतकºयांना मार्केटिंगचे ज्ञान नसल्याने व्यथित झाला. अशा शेतकºयांसाठी तालुका कृषि अधिकारी विनय बोरसे, पंचायत समितीचे कृषी विभाग हे शेतकºयांच्या मदतीस धावून आले. त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून आपला माल आपणच विकावा यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त धुळे यांच्या परवानगीने धुळे येथे जीटीपी कॉलनीत विक्री सुरू केली. दुपारच्यावेळी शहरात फिरस्तीने त्याच बरोबर शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणे, बेटावदसह ग्रामीण भागातही या ठिकाणीही शेतमाल विक्रीला सुरवात केली. त्यात अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्री करून आडत हमाली दलाली वाचवून तालुक्यातील शेतकºयांनी स्वत:च शेतमालास बाजारभाव ग्रेडिंग ठरवून पॅकिंंग करून विक्री केले. शहरातील ग्राहकांशी थेट संपर्क आल्याने त्यांनाच गहू,दादर, उन्हाळी बाजरी स्वत: चागल्या भावात विक्री केली. यात कमखेडा येथील शेतकरी राजेंद्र पवार, शामकांत पवार यांनी दादर े विक्री केली. अजंदे ,होळ येथील मनसाराम परदेशी,रतीलाल पाटील, पी. एम. सोनवणे, यांनी गहू विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात एकट्या बाजरी पिकाची उलाढाल ही सुमारे आठ कोटी रूपये, तर गहू पिकाच उत्पन्न 20हजार टन त्यात उलाढाल ४० कोटी रूपये, ,रब्बी ज्वारी(दादर) उत्पन्न ६ हजार टन,त्यात उलाढाल १५ कोटी रुपये, भाजीपाला, फळ पिकातून सुमारे एक कोटी असे ऐकून ६४ कोटी रुपये झाली.होळ येथील शेतकरि योगेश पाटील, सारवे येथील प्रदीप पाटील,आडगडे, विकवेल प्रदीप पाटील, मेथी महेंद्रसिंग गिरासे, प्रभाकर पाटील अंजनविहिरे, यशवंत महाजन बेटावद, या शेतकºयांनी भाजीपाला, मिरची, काकडी, ढेमसे, बिट, टमाटे, पपई, कलिंगड, पेरू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढून स्वत: विक्री केले. वरूळ-घुसरे येथील गिरासे यांनी ही डांगर व टरबुज याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले व स्वत: विक्री केली.याच काळात खरीपाचा कापूस विक्री अभावी ४० ते ५० टक्के पडून होता. त्यात बाजारसमितीच्या माध्यमातून सी सी आय ो सुमारे तीन लाख क्विंटल १६१ कोटी रूपयांचा कापूस खरेदी केला. तो राज्यात अव्वल ठरला आहे.