परीक्षा झाली नाही मात्र १ मेला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 09:57 PM2020-04-01T21:57:29+5:302020-04-01T21:57:51+5:30

शिक्षण विभाग : मूल्यमापान चाचणीतील गुणांवर ग्रेड

Examination was not done but result of 3 May | परीक्षा झाली नाही मात्र १ मेला निकाल

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या असल्यातरी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच पहिली ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा सुरू होवून १५ एप्रिल पर्यंत पेपर पूर्ण होत असतात.माञ यावेळी प्रथमच परीक्षांना ब्रेक लागला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षा होणार नसल्यातरी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर झालेल्या संकलित मुल्यमापन चाचणीत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना ग्रेड देण्यात येवून वार्षिक निकाल काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यावषीर्ही १ मे रोजी निकाल विद्यार्थ्यांना देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजनही केले आहे. शाळेत दररोज शिक्षक शाळेला सुटी असल्याने दिवसभर निकाल तयार करण्याच्या कामात मग्न दिसतात.

Web Title: Examination was not done but result of 3 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे