शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात तरुणांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

धुळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणात तरुणांपेक्षाही ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह जास्त दिसून येतो आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ...

धुळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणात तरुणांपेक्षाही ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह जास्त दिसून येतो आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ९२ हजार २०४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर ८ हजार १३४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील ७० हजार १४८ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे.

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात पोलीस कर्मचारी, होमगार्ड व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पुढच्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. कोरोना लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद चांगला राहिला आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणात खोडा पडला आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ७ लाख २२ हजार इतकी आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या लक्षात घेता ८ लाख डोसची मागणी आरोग्य विभागाने केली होती. मात्र, मिळालेले ३३ हजार डोस आठवडाभरातच संपले आहेत.

धुळे शहरात सर्वाधिक लसीकरण

- धुळे शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत शहरातील १६ हजार ४९२ नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी यांच्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. १३ हजार ८९१ जणांनी पहिला तर २ हजार ६०१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात उत्साह -

ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा उत्साह दिसून येतो आहे. एकूण ६३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यापैकी २० केंद्र धुळे शहरात तर ४३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. तसेच ग्रामीण भागात आणखी ९२ केंद्र सुरू करण्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात आठवड्यातून केवळ तीन दिवस लसीकरण करण्यात येत होते. आता मात्र आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर दररोज लसीकरण होत आहे. लस टोचून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे.

प्रतिक्रिया -

आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात ९२ हजार जणांनी पहिला तर ८ हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या कमी डोस उपलब्ध आहेत. मात्र, शासनाकडे अधिक डोसची मागणी केली आहे.

डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

एकूण लसीकरण केंद्र - ६३

हेल्थ केअर वर्कर - १२,९८४

फ्रंटलाइन वर्कर - ९,६७०

४५ वर्षांवरील व ज्येष्ठ नागरिक - ७०,१४८

पहिला डोस घेतलेले एकूण - ९२,८०२

दुसरा डोस घेतलेले एकूण - ८,३५५