शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीत शालेय विद्यार्थ्यांना निवडणूकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:09 IST

शिरपूर : रंधे स्कूलचा उपक्रम, बॅलेट पेपरवर निवडणूक, खºयाखुºया मतदानाचा लुटला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : विद्यार्थी हा शालेय जीवनापासूनच परिपूर्ण व्हावा, त्याचा शैक्षणिक पाया मजबूत करतांना त्याला भारतीय लोकशाहीतील एक स्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व्हावी़ भविष्यात निवडूणकीला मतदान करावे लागणार असून त्यासाठी जनजागृती करण्याची गरजच भासणार नाही, म्हणून बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात मुलींना निवडणूकीचे धडे देण्यात आले़बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात शालेय मंत्रीमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. भारतात लोकशाही असून ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक मतदान पद्धतीने निर्भय वातावरणात, निरपेक्षपणे घेण्यात येते. शाळेत देखील प्रत्येक वर्गात मंत्रीमंडळ असते. त्यात वेगवेगळे मंत्री असुन मुख्यमंत्री पद देखील असते. मतदान पेटीचा उपयोग करून विद्यालयातील सर्व मुलींनी मतदानाचा आनंद घेतला.शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया म्हणजे काय? आपला उमेदवार आपण कसा निवडतो? प्रचार यंत्रणा कशी राबविली जाते? अगदी निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापासून ते शेवटी निकाल जाहिर होण्यापर्यंतची ही प्रक्रिया मुलींना समजावी व भारताचे आदर्श नागरीक यातून घडावेत यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घेतल्याचे शाळाप्रमुख कल्पना पाटील यांनी सांगितले़विशेष म्हणजे या निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी प्रसिध्द करणे, मतपत्रिका छापणे, मतदान विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून प्रचार करणे, निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवड करणे, मतदान केंद्रात आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे, अगदी बोटाला निळी शाई लावण्यापासून ते मतपेटीत मतदान केलेली मतपत्रिका घडी करून टाकण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया मुलींनी अनुभवली़ या निवडणूकीचे विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली, एकही मतपत्रिका यात बाद गेलेली नाही़ यावेळी शाखाप्रमुख कल्पना पाटील, पंकज चव्हाण, सी.एस. बडगुजर, पर्यवेक्षक एन. एम. सोनवणे, रोहिणी रंधे, गणेश भामरे, बी. एन. ठाकरे, पी. आर. चव्हाण, जे. पी. पावरा, टी. टी. ढोले, वैशाली पवार, एस. ए. अहीरे, डी. जे. चव्हाण, निरज निकम, भावना भामरे, सुरेखा मालचे, मधुकर सोनवणे, राजेंद्र गिरासे, भिमराव धनगर, सचिन पवार उपस्थित होते.शालेश स्वराज्य सभा निवडणूक २०१९-२० या निवडणूक प्रक्रियेत गायत्री विजय देवरे या विद्यार्थींनीची शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली़ उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री मोनिका निकुम, अर्थमंत्री मोनिका कापुरे, परीपाठमंत्री भाग्यश्री पवार, अभ्यासमंत्री सुनैना भोसले, सांस्कृतिकमंत्री चेतना पाटील, सहलमंत्री पुनम बेडसे, क्रीडामंत्री वैष्णवी लोहार, आरोग्यमंत्री मृणाल पवार, वृक्षसंवर्धनमंत्री पुजा पावरा तर वसतीगृहमंत्री  सीमा पावरा यांची निवड करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे