शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

काम बंदमुळे पाणी योजना झाल्या ठप्प

By admin | Updated: March 7, 2017 23:18 IST

धुळे : नियमित वेतनासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़

धुळे : नियमित वेतनासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़ त्याचा परिणाम पाणी योजनावर झाला असल्याने त्या ठप्प आहेत़ राज्यभर हे आंदोलन सुरू असल्याने दैनंदिन पाणी योजनेच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे़ १ मार्च ते ४ मार्च २०१७ या चार दिवसांच्या कालावधीत कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज सांभाळले होते़ पण, शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाºयांनी आक्रमक होत ५ मार्च २०१७ पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला होता़ त्यानुसार ६ मार्चपासून काम बंद करत कार्यालयालगत कर्मचाºयांनी धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली़ मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता़ या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ सी़ निकम, एस़ बी़ पढ्यार, व्हीक़े़ सूर्यवंशी, एस़व्ही़ वाणी, पी़बी़ राठोड, यू़आऱ भोई अन्य कर्मचारी सहभागी झाले़१३६ कोटी पाणी योजनेचे काम सध्या या आंदोलनामुळे ठप्प झाले आहे़ या योजनेचा पहिला हप्तापैकी सुमारे ४३ कोटींचा निधी खर्च झाला आहे़ या कामाच्या पाठपुराव्यासह सुरू असलेले काम थांबविण्यात आलेले आहे़ याशिवाय,  वलवाडी पाणी योजना आणि शिंदखेडा येथील पाणी योजनेचे कामसुद्धा थांबविण्यात आलेले आहे़ नियमित वेतन मिळायला हवे, अशी मागणी कायम आहे़ निवृत्तही सहभागीया आंदोलनात जिल्ह्यातून ७०, तर राज्यभरातून साडेसहा हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत़ विशेष म्हणजे या आंदोलनात राज्यभरातून ९ हजारावर कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़