शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक परवाना देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभाग, धुळे ...

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभाग, धुळे येथील कार्यालयामध्ये शासनाने निर्देशित केल्यानुसार ५० टक्के अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कामकाज करण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रूव्ह केलेले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील. वाहनविषयक कामे हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद घेणे, कमी करणे याबाबत वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करीत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने सादर कामकाजासंदर्भात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवानाविषयक कामकाज सुरू राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती कामकाज बंद राहील. दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नूतनीकरण सारथी ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व पूर्तता करीत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अंमलबजावणी पथकाने रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी करण्यात येईल. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करण्यात येईल. सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी केलेल्या सूचनांप्रमाणे होत असल्याची खातरजमा करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाम नियमितपणे चालू राहील.

अभ्यागताना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे. आवश्यक कामासाठी ४८ तासांपूर्वी केलेल्या अँटिजेन चाचणीचा अहवाल सादर केल्यावर सकाळी १० ते २ या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे. कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.