आमदाराच्या वाहनाची धडक, दोन सख्खे भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:56 IST2019-05-19T17:55:20+5:302019-05-19T17:56:05+5:30
शेणपूर फाटा : रविवारी दुपारची घटना

आमदाराच्या वाहनाची धडक, दोन सख्खे भाऊ ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्रीचे आमदार डी़ एस़ अहिरे यांच्या वाहनाने साक्री पिंपळनेर रस्त्यावरील शेणपूर फाटाजवळ दोन जणांना जोरदार धडक दिली़ या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे अशी या सख्खे भावांची नावे आहेत़ ही घटना रविवारी दुपारी घडली़ घटनास्थळी गर्दी जमा झाली आहे़