शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश सुपुत्राच्या मास्कने संसद घेतेय 'श्वास'; मोदींनी केलं कौतुक, खासदार-अधिकाऱ्यांचीही दाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:30 IST

Dr. Sandip Patil : कोरोनाच्या काळातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनला उपस्थित राहणारे मंत्री, खासदारांनी कानपूर आयआयटीमध्ये तयार झालेले एन-९५ आणि एन-९९ हे ‘श्वासा’ मास्क वापरत आहेत.

ठळक मुद्देआयआयटी कानपूर व ई-स्पीन नॅनोटेक प्रा.लि. यांच्या माध्यमातून या मास्कची निर्मिती करण्यात आली.लोकसभा, राज्यसभेतील खासदार, अधिकारीवर्ग सध्या हाच मास्क वापरत आहेत.

-  अतुल जोशी

धुळे : खान्देश ही गुणवंतांची भूमी आहे. याच खान्देशच्या मातीत जन्मलेल्या व सध्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथे वास्तव्यास असलेल्या उद्योजकाने तयार केलेला मास्क संसद भवनात पोहोचला आहे. लोकसभा, राज्यसभेतील खासदार, अधिकारीवर्ग सध्या हाच मास्क वापरत आहेत.

कोरोनाच्या काळातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनला उपस्थित राहणारे मंत्री, खासदारांनी कानपूर आयआयटीमध्ये तयार झालेले एन-९५ आणि एन-९९ हे ‘श्वासा’ मास्क वापरत आहेत.

आयआयटी कानपूर व ई-स्पीन नॅनोटेक प्रा.लि. यांच्या माध्यमातून या मास्कची निर्मिती करण्यात आली. डॉ. संदीप पाटील यांच्या कंपनीने तयार केलेल्या मास्कची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्तुती केलेली आहे.

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडूनच डॉ. पाटील यांच्या कंपनीला २० हजार मास्क पुरविण्याची ॲार्डर मिळाली होती. पाटील यांनी विशिष्ट पद्धतीने पॅक करून संसदेत हे मास्क पोहोचविले आहेत. अतिशय अल्पदरात ही सेवा दिलेली आहे. प्रत्येक मंत्री, खासदारांना प्रत्येकी २० मास्क दिले.

इतर मास्कपेक्षा वेगळाई-स्पीनचे संचालक डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा हे मास्क वेगळे आहेत. त्यांना ‘श्वासा’ हे नाव देण्यात आलेले आहे. या मास्कची फिल्टरेशन क्षमता अन्य मास्कपेक्षा वेगळी आहे. जिवाणू, विषाणूविरोधी गुणधर्माने युक्त अशा या मास्कची निर्मिती दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. महामारीच्या काळात या मास्कचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे.दरम्यान, डॉ. संदीप पाटील यांना या कामात नितीन चऱ्हाटे (जळगाव) व डॉ. सुनील ढोले (शेगाव) यांचीही मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विदेशातही निर्यातडॉ. संदीप पाटील यांच्या कपंनीमार्फत दररोज ३० ते ४० हजार मास्क तयार केले जातात. आतापर्यंत एक करोड मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ भारतातच नाही तर विदेशात कॅनडा, युरोप, कोरिया, आदी विदेशातही या मास्कची निर्यात केली जात आहे.

डॉ. संदीप पाटील मूळचे पिंप्रीचे रहिवासीडॉ. संदीप पाटील हे मूळचे शिंदखेडा तालुक्यातील पिंंप्री गावचे रहिवासी आहेत. एम.टेक. झाल्यानंतर ते पीएच.डी. करण्यासाठी २००६ मध्ये कानपूर आयआयटी याठिकाणी गेले. पीएच.डी. करीत असतानाच त्यांनी २०१० मध्ये ‘ई-स्पीन नॅनोटेक’ नावाने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कंपनी सुरू केली. आयआयटी कानपूरच्या सहकार्याने आकारास आलेल्या त्यांच्या कंपनीत हल्ली दर्जेदार मास्कची निर्मिती केली जात आहे.

आमचे मास्क यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वापरलेले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाकडूनच २० हजार मास्क पुरविण्याची सूचना होती. त्यानुसार ‘श्वासा’ हे मास्क दिले आहेत. संसदेत सर्व सदस्य आमचेच मास्क वापरत आहेत, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.-डॉ. संदीप पाटील,संचालक, ई-स्पीन नॅनोटेक, कानपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद