शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:11 IST

मृतांच्या रक्ताचे नमुने पाठविणार प्रयोगशाळेत : पोलिसांकडून तपासाला वेग

ठळक मुद्देदुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत बाजीराव पवार वगळता अन्य संशयितानी खुनाची कबुली दिल्याचे समजते. या संदर्भात तपासाधिकारी सरिता भांड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत इन्कार केला आहे. अमळनेर येथून ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची ४८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील बाप-बेट्याच्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या संख्येत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ निजामपूरला सापडलेल्या कारनंतर काही बाबी चौकशीतून समोर येत आहेत़ दरम्यान, मयत रावसाहेब आणि त्यांचा मुलगा वैभव यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ देवपुरातील सरस्वती कॉलनीतील रावसाहेब पाटील (५४) आणि त्यांचा मुलगा वैभव (२१) यांच्या हत्येप्रकरणी ८ जणांविरुध्द संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आला आहे़ तपासाची चक्रे फिरवित पश्चिम देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन ८ संशयितांपैकी ६ जणांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत़ त्यांची कसून चौकशी केली जात आहे़ चौकशीतून कारचा उलगडाआईची तब्येत बरी नाही, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत दर्शन परदेशी नामक व्यक्तीने निजामपूर येथील राणे नगरातून  एमएच १५ डीजे ३७०० या क्रमांकाची कार मिलिंद भार्गव यांच्याकडून धुळ्यात आणली आणि घटनास्थळावरुन पळून जाण्यासाठी या कारचा आम्ही वापर केला असे कोठडीतील आरोपींच्या सांगण्यावरुन कारचा उलगडा झाला़ संशयित दर्शन परदेशी रडावरआता ही कार आणणारा दर्शन परदेशी या संशयिताचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे़ त्याला शोधण्यासाठी धुळ्याचे पथक निजामपुरला गेले होते. मात्र तो न सापडल्याने, पथकाला खालीहात परतावे लागले. तो हाती लागल्यानंतर या दुहेरी खून प्रकरणात त्यालादेखील आरोपी केले जाईल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे़ पोलीस त्याच्या शोधात आहेत़ वाहनातून घेतले रक्ताचे नमुनेमयत रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव या दोघांना घटनास्थळावरुन जखमी अवस्थेत एमएच १८ डब्ल्यू ५७७८ या क्रमांकाचे वाहनातून शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले होते़ त्यामुळे या वाहनात दोघांचेही रक्त सांडले होते़ परिणामी हे वाहन तपासणीसह रक्ताचे नमुने घेण्यासाठी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला हे वाहन आणण्यात आले होते़ सहायक रासायनिक विश्लेषक हालोर यांनी या वाहनातून रक्ताचे नमूने घेतले़ याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे नमुने संकलित करण्यात आले़ आता हे नमुने उत्तरीय तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ संशयित बाजीरावांची चौकशीदुहेरी खून प्रकरणातील संशयित माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे़ अन्य संशयित आरोपींप्रमाणे त्यांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे़ चौकशीचा एक भाग म्हणून बाजीराव पवार यांची मंगळवारी स्वतंत्र चौकशी करण्यात आली आहे़ त्यांचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे, गुन्हा घडण्यामागे नेमके कोणते कारण होते, यासह अन्य मुद्यांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी झाल्याचे सुत्रांनी सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा