आॅनलाइन लोकमतलामकानी, ता.धुळे : जागतिक वन दिनीच लामकानी वनक्षेत्रातील डोंगरावर आज सकाळी भीषण आग लागली. आगीत १०० ते १५०हेक्टर क्षेत्रावरील वनसंपत्ती, चारा, जळून खाक झाले. सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगील लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धुळे तालुक्यातील लामकानी वनक्षेत्रात असलेला डोंगर गोवर्धन पर्वत म्हणून परिचीत आहे. या डोंगरावर शनिमंदिर व आरभुजा देवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ आज साफसफाईचे काम सुरू होते. त्याचवेळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डोंगरावर आग लागली. हवा असल्याने आग हळूहळू पसरत गेली. डोंगरावरील जवळपास १०० ते १५० हेक्टर क्षेत्रावर ही आग पसरली. आग लागल्याचे समजताच गावातील शेकडो तरूण, तसेच इंग्रजी मेडीयम शाळेचे १०० ते १५० विद्यार्थ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग विझवित असतांना काही तरूणांना चटकेही बसले. आगीत डोंगरावरील वनसंपत्ती, हजारो टन गवताचा चारा खाक झाला.तर ससे, सरडे, पशुपक्षी मृत झाले. आग विझविण्यासाठी धुळे येथुन अग्निशमनदलाची गाडीही आली होती.सुमारे सहा तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.
वनदिनी लामकानी वनक्षेत्रात पेटला भीषण वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:04 IST
हजारो टन चारा खाक : लाखोंचे नुकसान
वनदिनी लामकानी वनक्षेत्रात पेटला भीषण वणवा
ठळक मुद्देसकाळी ११ वाजेच्या सुमारास आगीला सुरवात तरूण, विद्यार्थ्यांनी आग विझविण्यासाठी केले प्रयत्नसहा तासानंतर आगीवर नियंत्रण