शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती नदीपात्रात पूल नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:02 IST

पूलाची मागणी : प्रकल्पातून विसर्ग सोडल्यास शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर-रामी रस्त्यादरम्यान अमरावती नदीपात्रावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. नदीवर पूल नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.पावसाळ्यादरम्यान अमरावती प्रकल्पामधून वेळोवेळी पाणी सोडावे लागत असल्यामुळे या पाण्यातून मालपूर ग्रामस्थ मार्गक्रमण करत असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर मालपूर गावाचे अमरधाम असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते.मालपूर बसस्स्थानक येथून तालुक्यातील रामी व नंदुरबार जिह्यातील नंदुरबार व शहादा येथे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असून सोयीचा आहे. या रस्त्यावरुन खूप मोठी रहदारी असते. मात्र पावसाळ्यात अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर किंवा धरणाच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अचानक केव्हाही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे हा रस्ता पुलाअभावी बंद होतो.मालपूर ग्रामस्थांच्या शेतजमिनी कसण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच या शेतकऱ्यांचे पशुधन देखील शेतशिवारातच असल्यामुळे नाईलाजास्तव धोका पत्करुन पाण्यातून हे शेतकरी मार्गक्रमण करीत असतात. खरीपातील शेती उत्पन्न घरादारात आणण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे नदीपात्रात पूल होणे गरजेचे आहे.याच मार्गावर ग्रामदैवत श्री व्यांघ्रंबरीदेवीचे मंदिर असून दूरवरचे भाविक येथे सदैव दर्शनासाठी व मानमानता फेडण्यासाठी येत असतात. मात्र पूल नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.शासनाने वेळीच दखल घेऊन या उन्हाळ्यात अमरावती नदीपात्रात पूलाची निर्मिती करावी, अशी मालपूर ग्रामस्थांसह मोयाने, चोरझिरा आदी शेतशिवारातील शेतकºयांची व या मार्गावरुन प्रवास करणाºया प्रवाशांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे