DHULE Municipal Election Results 2018 Live : भाजपाला 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळणार, एमआयएमचे चार उमेदवार विजयी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:46 IST2018-12-10T10:09:24+5:302018-12-10T13:46:41+5:30
DHULE Municipal Election Results: धुळ्यात भाजपा आघाडीवर आहे...

DHULE Municipal Election Results 2018 Live : भाजपाला 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळणार, एमआयएमचे चार उमेदवार विजयी
धुळे: महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीतभाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. धुळ्यात भाजपाचे 37 उमेदवार आघाडीवरून असून, धुळे महानगरपालिकेत भाजपा मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी काल केला होता. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व त्यांचे चिरंजीव डॉ. राहुल भामरे, अनिल गोटे व त्यांच्या पत्नी हेमा गोटे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले आदींनी मतदान केले होते. धुळ्यात ७४ (१ बिनविरोध) जागांसाठी तर ६८ जागांसाठी मतदान झाले होते. त्याचा आज निकाल लागणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या.
LIVE
01:11 PM
धुळ्यात भाजपा ३८, कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी १८, लोकसंग्राम ३, शिवसेना ७ ,सपा १, इतर ८जागांवर आघाडी
01:05 PM
धुळ्यात एमआयएमनं खातं उघडलं, एमआयएमचे चार उमेदवार विजयी
12:57 PM
धुळे- मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी जास्त वाढली, गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
12:05 PM
धुळे - आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांची प्रभाग पाचमधून १०० मतांनी आघाडी कमी झाली...
12:03 PM
धुळ्यात भाजपा 37 जागांवर आघाडीवर असून, सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे...
11:28 AM
धुळ्यात शिवसेना 3 जागांवर आघाडीवर
11:19 AM
धुळे - लोकसंग्रामचे अध्यक्ष अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे प्रभाग पाचमधून 290 मतांनी आघाडीवर
11:16 AM
धुळे- धुळ्यात भाजपा 22 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 14 आणि लोकसंग्राम तीन शिवसेना तीन आणि सपा एक आणि इतर एक जागेवर आघाडी
11:13 AM
धुळे - मनपा निकालांबाबत शहर व जिल्ह्यात जबरदस्त उत्सुकता
11:08 AM
धुळे-पहिल्या फेरीत भाजपाचे शीतल नवले, अमोल मासुळे आघाडीवर
धुळे -पहिल्या फेरी अखेर भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले आणि भाजपच चंद्रकांत सोनार व देवा सोनार हे पिता पुत्र आघाडीवर
11:06 AM
धुळे मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी
11:02 AM
धुळे - मतमोजणी केंद्रातील वायफाय बंद करा, ईव्हीएम हॅक होण्याचा धोका - राष्ट्रवादीचे प्रभाग 9 मधील रवी रणसिंग यांची मागणी
10:54 AM
धुळ्यात भाजपाचे दोन, तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आघाडीवर
धुळे -पहिल्या फेरी अखेर भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले आणि चंद्रकांत सोनार आघाडीवर
10:40 AM
धुळ्यात पोस्टल मतमोजणीत भाजपाने चार जागांवर आणि लोकसंग्राम एक जागेवर आघाडीवर
धुळ्यात पोस्टल मतमोजणीत भाजपाने चार जागांवर आणि लोकसंग्राम एक आघाडीवर
10:32 AM
धुळे - महापालिका निवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात
धुळे - महापालिका निवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात