शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:19 IST

लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरी, चर्चेमध्ये सहभाग या आधारे सगळ्या खासदारांमध्ये भारतात दुसरा नंबर

धुळे : देशाच्या संसदरत्न पुरस्कार कमिटीने १७ व्या लोकसभेसह राज्यसभेतील १० खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला आहे. त्यात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.लोकशाहीत संसद हे एक मंदिर असते व पूर्ण देशाचे प्रश्न येथे मांडले जातात, कायदे बनविले जातात त्या अनुषंगाने येथे अतिशय महत्वपूर्ण चर्चा व वादविवाद होते. त्यामुळे जे खासदार मोठ्या प्रमाणात या वादविवादामध्ये भाग घेतात व जनसामान्याच्या कल्याणाशी जोडलेले प्रश्न सभागृहात मांडतात व सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतात. असे सगळ्यात प्रभावशाली खासदारांना पुरस्कार दिला गेला पाहिजे, असे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाटत होते़ त्यांच्या आग्रहास्तव पुरस्कार देण्याचा उपक्रम सुुरु करण्यात आला़ त्या प्रमाणे १४ व्या, १५ व्या, १६ व्या लोकसभेच्या वेळेस प्रभावी खासदारांना पुरस्कार दिले गेले होते.१७ व्या लोकसभेच्या (आताच्या) विविध कार्यात प्रश्न विचारणे, वेगवेगळ्या चर्चेत भाग घेणे, त्यात पहिला नंबर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो व भारतात दुसरा नंबर खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा लागतो. त्यांनी १७ व्या लोकसभेत एका वर्षात (लोकसभेच्या कार्यकाळात) एकूण २०२ प्रश्न हे जनसामान्यांच्या हितांचे मांडले व वेगवेगळ्या वादविवादामध्ये सहभाग घेतला.संसदरत्न पुरस्कार देण्याचे निकषसंसदेतील उपस्थिती, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग, सभागृहात प्रश्न विचारणे आणि सभागृहातील विविध चर्चेत सहभाग घेणे हे काही निकष होते़ हे निकष डोळ्यासमोर ठेऊन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला. हे निकष डॉ़ भामरे यांनी पार केले़तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी १६ व्या लोकसभावेळी देशाचे संरक्षण राज्यमंत्री पद उत्तम प्रकारे सांभाळले आहे. तसेच वेळोवेळी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे