४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:15 IST2025-12-21T17:11:41+5:302025-12-21T17:15:53+5:30

Dhule Local Body Election Result 2025: या निकालानंतर धुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

dhule local body election result 2025 congress rule overturned after 40 years bjp historic victory in shirpur varvade nagar parishad | ४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या

४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या

Dhule Local Body Election Result 2025: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. या सगळ्याचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसत आहे, तर काही ठिकाणी गड राखण्यात यश येत आहे. यातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर-वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत तब्बल ४० वर्षांनंतर भाजपाने ऐतिहासिक यश मिळवत सत्ता स्थापन केली. 

गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर-वरवाडे नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपाला बहुमत बहाल केले आहे. सन २०१९ मध्ये शिरपूरचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शिरपूर शहर आणि परिसरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत गेली. या पार्श्वभूमीवर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले असून नगरपालिकेच्या एकूण ३२ जागांपैकी तब्बल ३१ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. उर्वरित एकमेव जागा एमआयएम पक्षाला मिळाली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे चिंतनभाई पटेल विजयी

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. चिंतनभाई पटेल यांना तब्बल १६ हजारांहून अधिक मते मिळाली. या विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष पाहायला मिळाला. या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की, शिरपूरच्या जनतेने विकासाला मत दिले आहे. येथील जनता सुज्ञ असून मतदार राजा कोणत्याही भूलथापांना बळी पडलेला नाही. विकासकामे, पारदर्शक कारभार आणि भविष्यातील योजनांवर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाजपाचा मोठ्या प्रमाणात विजय झाला.

दरम्यान,  भाजपाच्या नेत्यांनीही हा विजय म्हणजे शिरपूरच्या विकासाला मिळालेली पावती असल्याचे सांगितले. आगामी काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले आहे. काँग्रेससाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात असून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकूणच, शिरपूर-वरवाडे नगरपालिकेच्या निकालाने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले असून भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Web Title : भाजपा ने 40 साल का कांग्रेस शासन उलटा, धुले में ऐतिहासिक जीत।

Web Summary : शिरपुर-वरवाडे में भाजपा ने कांग्रेस के 40 साल के शासन को खत्म किया। भाजपा ने 32 में से 31 सीटें जीतीं, चिंतनभाई पटेल मेयर चुने गए। अमरीशभाई पटेल ने विकास को जीत का श्रेय दिया। बुनियादी ढांचे पर ध्यान दिया जाएगा।

Web Title : BJP ends 40-year Congress rule with historic Dhule victory.

Web Summary : In a historic win, BJP ended Congress's 40-year reign in Shirpur-Varwade. BJP won 31 of 32 seats, with Chintanbhai Patel elected as mayor. Amrishbhai Patel credited development for the victory. Focus will be on infrastructure and basic amenities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.