धुळे जेलची सुरक्षा 'रामभरोसे'! शेती करायला गेलेला कैदी झाला फरार; पोलिसांना दिली सिनेस्टाईल हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:14 IST2026-03-06T14:13:32+5:302026-03-06T14:14:27+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर नाशिकच्या पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

Dhule Jail security 'Rambharose Prisoner who went to farm absconded; Police given Cinestyle escape | धुळे जेलची सुरक्षा 'रामभरोसे'! शेती करायला गेलेला कैदी झाला फरार; पोलिसांना दिली सिनेस्टाईल हुलकावणी

धुळे जेलची सुरक्षा 'रामभरोसे'! शेती करायला गेलेला कैदी झाला फरार; पोलिसांना दिली सिनेस्टाईल हुलकावणी

धुळे- नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील एका खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी भिकन पिंजारी हा धुळे येथील खुल्या कारागृहातून पसार झाला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर नाशिकच्या पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

Crime News :'दृश्यम' स्टाईल बनाव फसला! सख्ख्या भावाची चाकू खुपसून हत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

 या प्रकरणात न्यायालयाने ३० एप्रिल २०२२ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. धुळे कारागृह प्रशासनाने त्याची नियुक्ती कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेतीकामासाठी केली होती. सकाळी शेतीकाम सुरू असताना, बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्याने संधी साधली आणि तिथून पळ काढला.

पोलीस कारवाई

कैदी फरार झाल्याचे लक्षात येताच कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. या प्रकरणी कारागृहातील शिपायाने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, त्याला पकडण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

कारागृहासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणाहून जन्मठेपेचा कैदी पसार झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
 

Web Title : धुले जेल सुरक्षा में चूक: आजीवन कारावास की सजा काट रहा कैदी फरार

Web Summary : धुले खुली जेल से आजीवन कारावास की सजा काट रहा कैदी भीकन पिंजारी खेत में काम करते समय भाग गया। वह हत्या और अपहरण के आरोप में सजा काट रहा था। पुलिस ने तलाशी अभियान शुरू कर दिया है। इस घटना से जेल सुरक्षा पर सवाल खड़े हो गए हैं।

Web Title : Dhule Jail Security Lapses: Life-Term Prisoner Escapes While Farming

Web Summary : A life-term prisoner, Bhikan Pinjari, escaped from Dhule open jail while working in the fields. He was serving time for murder and kidnapping. Police have launched a search operation. The incident raises concerns about jail security.