शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लॉन्स, हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 16:28 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक येण्यास मनाई

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेलमधील अथवा अन्य वास्तूमधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमीटरूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, आॅनलाइन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग ३१ मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.राज्यात कोरोना विषाणूमुळे उदभवणाºया संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालिन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साथरोग अधिनियमातील खंडानुसार राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी १३ मार्च २०२० पासून सुरू झाली आहे.कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेल मधील अथवा अन्य वास्तू मधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमिट रूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, आॅनलाईन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग आदी स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात येत आहेत.तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील. याशिवाय वर नमूद ठिकाणी याआधी कार्यक्रमासाठी आरक्षण, परवानगी दिलेली असल्यास ती रद्द करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र उपाययोजना नियम, भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे