जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 17:00 IST2020-01-03T16:59:03+5:302020-01-03T17:00:05+5:30

'सत्य परेशान होता है पराजित नाही'

devendra fadnavis attack on uddhav thackeray government in dhule rally | जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या प्रचारार्थ नरडाणा येथे आयोजित प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वाधिक १०५ जागा भाजपाला मिळाल्या. जे हरले त्यांच्यासोबत शिवसेना निघून गेली. जनतेशी बेईमानी करून हे सरकार आले आहे. 

याचबरोबर, विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला होता.मात्र शिवसेनेने सत्तेसाठी विश्वासघात करुन दुसऱ्यांशी घरोबा केला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले आणि ४० टक्के असलेल्या विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा अशा 2 निवडणुका झाल्या. यामध्ये जनतेने भाजपाला पसंती दिली. देशाचा इतिहास सांगतो, बेईमानीने स्थापन झालेले सरकार 7 महिन्यांच्यावर चालत नाही. सत्य परेशान होता है पराजित नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

Web Title: devendra fadnavis attack on uddhav thackeray government in dhule rally