ग्रामीण भागात रॅाकेलची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST2021-02-21T05:07:55+5:302021-02-21T05:07:55+5:30
म्हसदी परिसरातील मोबाइलधारक त्रस्त कुसुंबा : धुळे तालुक्यातील कुसुंबा भागात अनेक दिवसापासून मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले ...

ग्रामीण भागात रॅाकेलची मागणी
म्हसदी परिसरातील मोबाइलधारक त्रस्त
कुसुंबा : धुळे तालुक्यातील कुसुंबा भागात अनेक दिवसापासून मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. संबंधित खासगी कंपन्यांच्या गलथान कारभाराबाबत मोबाइलधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.
ट्रॅव्हल्सचा होताे वाहतुकीला अडथळा
धुळे : शहरात विविध ठिकाणी मुंबई, पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स उभ्या असतात. या सर्व लांबलकच गाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने, त्याचा अडथळा इतर वाहनांना होत असतो. त्यामुळे या ट्रॅव्हल्ससाठी ठरावीक जागा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
थंडी वाढू लागताच चहाला मागणी
धुळे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला आहे. आहे. थंडी वाढू लागल्याने गरमागरम चहालाही मागणी वाढलेली आहे. शहरात अनेक भागात चहाच्या टपरींवर गर्दी असते. त्यामुळे व्यावसायिकही खूश आहेत.
चारा विक्रेत्यांना इतरत्र जागा द्यावी
धुळे : येथील बाजार समितीजवळच हिरवा चारा विक्रेते चारा विक्री करीत असतात. ते रस्त्यावरच चारा ठेवत असल्याने, त्याचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना होत असतो. त्यामुळे या चारा विक्रेत्यांना दुसरीकडे जागा देण्यात यावी.
रस्त्यावर लावले दिशादर्शक फलक
धुळे : एक वर्षापूर्वी फागणे ते अमळनेर पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले होते. मात्र या रस्त्यावर वळण रस्त्याचे फलक लावण्यात आलेले नव्हते. मात्र आता संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात आल्याने, अंधारातही रस्त्याची माहिती चालकांना मिळू लागली आहे.
पांझरेचे नदीपात्र झाले कोरडेठाक
धुळे : गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे पांझरा नदीला ॲाक्टोबर अखेरपर्यंत पाणी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पातळी कमी होत गेली. आता नदीपात्र कोरडेठाक झालेले आहेत. त्यामुळे नदीत स्वच्छता करावी, अशी मागणी आहे.
वीज चोरीला आळा घालण्याची मागणी
नरडाणा : ग्रामीण भागात अगोदरच पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा मिळत नाही. त्यातच ग्रामीण भागात वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागतो. वीजचोरीला आळा घालण्याची मागणी आहे.
शिंदखेडा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक
शिंदखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा वाढलेली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागात जाणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात येतात. वाहनांच्या बोनेटवरही प्रवासी बसवित असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडरचा वापर
धुळे : अनलाॅक झाल्यानंतर सध्या हॅाटेल व्यवसाय अतिशय तेजीत सुरू झालेला आहे. मात्र व्यावसायिक सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, अनेक किरकोळ व्यावसायिक व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसून येत आहे.