जयहिंद परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:12 IST2020-01-11T23:12:03+5:302020-01-11T23:12:39+5:30

संडे अँकर । महापालिका व पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे दिलेत आदेश

 Demand for encroachment of Jayhind area | जयहिंद परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी

Dhule

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर व पळासनेर टोल प्लाझा येथील कामगार, कर्मचाऱ्यांना बिगरासारखी वागणूक दिली जाते़ तसेच त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे़ कामगारांना न्याय देवून व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिलीप जमदाडे यांच्याकडे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या पदधिकाऱ्यांकडून करण्यात आली़
सात ते आठ वषार्पासून कर्मचारी टोल प्लाझावर कार्यरत आहेत. सध्या ३० कर्मचारी काम करीत आहेत. सदरील कर्मचाºयांचा पी. एफ ३२५ रूपयांप्रमाणने वेतनातून कपात केला जातो. तसेच पावसाळ्यात बाहेरील ५० कर्मचारी लावून काम केले जाते. याशिवाय कामगार कायद्यानुसार भर पगारी साप्ताहिक सुट्टी, इतर शासकीय सुट्या देण्यात येत होत्या. मात्र दोन वषार्पासून कर्मचाºयांचे काम केवळ २० कर्मचाºयांकडून करून घेतले जाते. तसेच प्रशासन पीएफ कपात करून कामगारांना ३०० रुपये दिले जाते़ टोल प्लाझाकडून कामगार कायद्याचे उल्लंघन कामगारांचे आर्थिक शोषन केले जाते़ साप्ताहिक सुट्टी दिली जात नाही. सुटी घेतली तर वेतन कापले जाते. वेतनातून कापलेली पीएफची रक्कम खात्यात भरली जात नाही. तसेच दरमहा किमान वेतनही देण्यात येते. मात्र त्यांचे कोणतेही विवरण दिले जात नाही. टोल प्रशासनावर कारवाई करून कर्मचाºयांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे़ यावेळी भाऊसाहेब थोरात, शिवाजी धनगर, सचिव सुनील भिल, आनंद शिंदे, सुकदेव थोरात, दिनेश कोळी, राहुल कोल, प्रा. महादेव जमधडे, अ‍ॅड. चंद्रकांत बैसाणे, विनायक निकुंभे, संदीप भिल, कमलाकर सौंदाणकर, यशवंत महिरे उपस्थित होते़

Web Title:  Demand for encroachment of Jayhind area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे