शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:39 IST

केवळ २८ टक्के पालकांची संमती

धुळे : जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. आश्रमशाळा निवासी असल्याने अधिक काळजी घ्यावी लागेल. तसेच मुख्याध्यापकांचा अभिप्राय आवश्यक आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा तसेच आश्रमशाळांमधील सुरक्षेच्या तयारीचा संपूर्ण अभ्यास करुनच निर्णय घेतला जाइल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील शाळा आणि आश्रमशाळा सुरू करण्याच्या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभागाची बैठक झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ७ डिसेंबरपासून सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. तसेच शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दुसऱ्या टप्प्यात घेतला जाइल असा निर्णय घेण्यात आला.परंतु आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा सुरू करण्याच्या बाबतीत या बैठकीत निर्णय होवू शकला नाही. आश्रमशाळा निवासी असल्याने पुर्णवेळ मास्क, सॅनिटायझर आणि इतर सुरक्षा उपकरणांची व्यवस्था आहे किंवा नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होइल किंवा नाही आदी प्रश्न आहेत. शिवाय आश्रमशाळेतील विद्यार्थींच्या पालकांपैकी केवळ २८ टक्के पालकांनी संमती दिली आहे. पालकांची पुर्ण संमती मिळाल्याशिवाय आश्रमशाळा सुरू करणे योग्य होणार नाही. तसेच या बाबतीत मुख्याध्यापकांचा अभिप्राय देखील आवश्यक असल्याने त्यांचा अभिप्राय मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.विद्यार्थी संख्या अशीधुळे जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत २५ वसतिगृह असून त्यात ३ हजार ५१० विद्यार्थी आहेत. आश्रमशाळांची संख्या २२ असून त्यात ९ हजार ४६ विद्यार्थी आहेत. खाजगी अनुदानित ३४ आश्रमशाळा असून त्यात १९ हजार २२५ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थींच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे