शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शेती खातेफोडअभावी अपात्रतेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:14 IST

शेतकरी सैरभैर : पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत सरकारनेच तोडगा काढण्याची मागणी

साक्री : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात नव्हे तर राज्यात अनेक शेतकऱ्यांची जमिनीची अद्याप खाते फोड झालेली नाही. त्यामुळे कुटुंब जरी विभक्त असले तरी शेती मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर असल्याकारणाने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत.सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांना कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना दर वर्षी सहा हजार रुपये इतका निधी मिळणार आहे यासाठी तालुक्यातील महसूल स्तरावर शेतकºयांची माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्धही करण्यात आली आहे.परंतु अनेक गावांमध्ये पूर्वापार शेतकºयांच्या जमिनीची खातेफोड न झाल्याने किंवा अतिशय किचकट प्रकरण असल्याकारणाने अनेक शेतकरी खातेफोड करण्यापासून लांबच राहिले आहेत. तर काही शेतकºयांच्या आजोबा-पणजोबांच्या नावावर आजही जमिनी आहेत. कुटुंबाचा प्रचंड विस्तार झालेला असून कुटुंबातील अनेक सदस्य मयत झाले आहेत. त्यामुळे खातेफोड करण्यास शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.मोठ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक सदस्यांमध्येच मतभेद असल्याकारणाने शेतजमिनीची खाते फोड होऊ शकत नाही किंवा अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या नावावरच शेत जमिनी आहेत. यामुळे सातबारा उताºयावर जमिनीचे प्रमाण दोन हेक्टरपेक्षा अधिक असल्याने शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही शेतकºयांच्या वाट्यास एक एकर पेक्षाही कमी जमीन आहे. परंतु त्याच्या सातबाºयावर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे लागलेली आहेत. भावा-भावांची तोंडी वाटणी झाल्यावरही सातबारा उताºयावर मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर जमीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरीही सैरभैर झालेले आहेत यासाठी शासनाने योग्य तो पर्याय काढून अशा वंचित शेतकºयांनाही लाभ मिळायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.ज्या शेतकºयांच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल आणि त्यात त्याच्या इतर भावांचाही वाटा असेल अशा शेतकºयांची व जमिनीची फोड करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, त्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे

टॅग्स :Dhuleधुळे