धुळेनजिक अवधानला शेड लावण्यावरुन हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:15 IST2018-06-02T13:15:41+5:302018-06-02T13:15:41+5:30
मोहाडी पोलीस : ७ जणांविरुध्द गुन्हा

धुळेनजिक अवधानला शेड लावण्यावरुन हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पत्र्याचे शेड लावू दिले नाही या कारणावरुन अवधान शिवारातील मनीष सर्व्हिस सेंटरजवळ हाणामारीची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तीन जणांना दुखापत झाली़ मोहाडी पोलिसात शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
धुळे तालुक्यातील अवधान येथे राहणारा सुनील भगवान गोसावी (३८) याने मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मनीष सर्व्हिस सेंटर आहे़ या ठिकाणी पत्र्याचे शेड लावू दिले नाही या कारणावरुन दोन गटात वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ ते साडेसहा वाजेच्या सुमारास झाली़ हाणामारीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ यात सुनील भगवान गोसावी, शरद भगवान गोसावी, परमानंद वेडूगीर गोसावी (सर्व रा़ अवधान ता़ धुळे) हे जबर जखमी झाले़ त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी सुनील गोसावी याने मोहाडी पोलीस स्टेशनला शनिवारी पहाटे अडीच वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित सुरेश मुरलीधर गोसावी, मुकेश मुरलीधर गोसावी, आनंदा मुरलीधर गोसावी, मुरलीधर दगा गोसावी, संजय दगा गोसावी, ऋषिकेश संजय गोसावी, गणेश संजय गोसावी (सर्व रा़ अवधान ता़ धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ संशयितांना पकडण्यात आलेले नाही़