CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:26 IST2020-08-07T14:25:26+5:302020-08-07T14:26:13+5:30
शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे.

CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा
धुळे: शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड सेंटरवर निकृष्ट जेवणावरून रुग्णांनी मैदानात जमून गर्दी करत दांगाडो केला. याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील कोरणा पॉझिटिव रुग्णांसाठी शासनाने शिंगावे येथे कोवीड सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी शिरपूर तालुक्यातील कोरणा पॉझिटिव रुग्णांना व कोरोन टीन रुग्णांना उपचारासाठी ठेवले जाते. शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे.
यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु शिंगावे येथील सेंटर रोड अधिकारांच्या दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. नाश्ता ,चहा ,आयुर्वेदिक काढा सकाळी आठ वाजता अवजी दहा साडेदहा वाजता दिला जातो. तसेच दुपारचं जेवण दीड ते दोन वाजेला दिला जातो. तसेच रात्रीच्या जेवणाचा टाइमिंग नाही. तसेच चे नाश्ता जेवण दिले जातात ते एकदम निकृष्ट दर्जाचे दिले जाते. त्यामुळे आज सकाळी रुग्णांचा संताप उफाळून आला.
सकाळी दहा वाजेला नाश्ता आल्यानंतर सगळे रुग्ण मैदानात सोशल डिस्टंसिंग ठेवून जमले होते. त्यावेळेस रूग्णांनी घेऊन आणणाऱ्या बाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नागरिकांचा संताप बघून सदर बाई ने तिथून काढता पाय घेतला. नागरिक नाश्ता वर बहिष्कार टाकत होते . परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यामुळे नाश्ता घेतला. शासन लाख रुपये अनुदान देऊनही या सेंटरवर रुग्णांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.