शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्याच्या उमेदवारीवरून पक्ष निरीक्षकांसमोरच वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:33 IST

राष्टÑवादीतर्फे मुलाखती, अनेक इच्छुकांची होती गर्दी

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीतर्फे इच्छुकांच्या मुलाखतीशिंदखेडा मतदार संघासाठी तिघे इच्छूकउमेदवारीवरून झाला वाद

आॅनलाइन लोकमतधुळे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती दरम्यान शिंदखेडा मतदार संघातून उमेदवारी मागण्यावरून दोन गटात शाब्दीक वाद उफाळून आला. पक्ष निरीक्षकांसमोरच वाद झाल्याने, तो मिटविण्यासाठी राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान धुळे शहरातून उमेदवारीसाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे एकमेव नाव आहे. तर शिंदखेडा मतदार संघासाठी तिघांनी मुलाखती दिल्या.विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने यापूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. ज्यांनी अर्ज केले होते, त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी द्विसदस्यीय समिती आज धुळ्यात आली होती. या समितीत प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी उमेश पाटील, धुळे जिल्हा निरीक्षक नाना महाले यांचा समावेश होता. राष्टÑवादी भवनात शिंदखेडा व धुळे शहर मतदार संघासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. धुळे शहर मतदार संघातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे एकमेव नाव आहे. तर शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून माजी आमदार रामकृष्ण पाटील, संदीप बेडसे, व पंचायत समिती सदस्य ललित वारूड इच्छुक आहेत. दरम्यान ललित वारूडे यांनी उमेदवाराची इच्छा व्यक्त करताच त्यावर मुडावदचे माजी सरपंच सुनील लांडगे व इतर काही जणांनी जोरदार आक्षेप घेतला. शक्तीप्रदर्शनावरूनही बराच वाद झाला. पक्ष निरीक्षकांसमोरच शाब्दीक वाद सुरू झाल्याने, अखेर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकावा लागला.यानंतर पक्ष निरीक्षक उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एकोप्याने निवडणुकीला समोरे जाण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, साहेबराव देसाई, कैलास चौधरी, ज्योती पावरा, इरशाद जहागीरदार, कुणाल पवार, सरोज कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे