महाडीबीटी योजनांसाठी पोर्टलवर संपर्क साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:05+5:302021-03-01T04:42:05+5:30

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात ...

Contact the portal for MahaDBT schemes | महाडीबीटी योजनांसाठी पोर्टलवर संपर्क साधा

महाडीबीटी योजनांसाठी पोर्टलवर संपर्क साधा

googlenewsNext

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून, एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. ही सुविधा कार्यान्वित केल्याचे २०२० - २०२१ हे पहिले वर्ष आहे. कृषी विभागाने वरील पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ११ जानेवारी २०२१ ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार प्राप्त सर्व अर्जांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. निवड झालेल्या ज्या शेतकऱ्यांना तसेच ज्या लाभार्थ्यांना प्राप्त झाला असेल, त्या सर्वांनी महाडीबीटी पोर्टलवर कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: Contact the portal for MahaDBT schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.