विंचूर येथील निवडणूक निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. येथे गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी सत्तांतर घडवून आणले. जवाहर परिवर्तन पॅनलला ११ पैकी ११ जागांवर विजय मिळविला आहे. जवाहर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत दामू खैरनार यांनी केले हाते, तर भाजपच्या ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांच्याकडे होते. वार्ड क्रमांक १ मध्ये ग्रामविकास पॅनल व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाउसाहेब देसले यांच्या मातोश्री यशोदाबाई देसले पराभूत झाल्या. विजयी उमेदवार असे- वार्ड १ भारती जनार्दन देसले, मीनाबाई लक्ष्मण सोनवणे, भाईदास छोटू ठाकरे. वार्ड २ प्रेरणा प्रदीप खैरनार, सुरेखा कृष्णा देसले, संदीप डिगंबर देसले. वार्ड ३- अशोक बाबुराव बोरसे, डाॅ.अशोक राजाराम पगारे. वार्ड ४- किसन शंकर बोर, योजना रवींद्र बोरसे, सुलकन मुरलीधर सोनवणे यांचा समावेश आहे. निकालानंतर विंचूर येथील कॅांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील व उमेदवारांना खांद्यावर घेत जल्लोष केला.
विंचूर ग्रामपंचायतीवर कॅांग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST