शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
5
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
6
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
7
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
9
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
10
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
11
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
12
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
13
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
14
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
15
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
16
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
17
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
18
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
19
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
20
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने पुन्हा जनजीवनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:48 IST

आरोग्यावर परिणाम : बदलत्या हवामानाने रुग्णांमध्ये वाढ; तापमान ६.६ अंशावर घसरले

धुळे : मागील महिन्यात तापमानाचा पारा ५ अंशापर्यंत उतरला होता. हि स्थिती बरेच दिवस राहिल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील चार पाच दिवसात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये गती आली. परंतु आता दोन दिवसापासून परत तापमान कमी झाल्याने पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पहाटे शहराच्या तापमानाचा पारा ६.६ अंशापर्यंत घसरल्याने गारठा वाढला. शुक्रवारी पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत वाहत असल्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवली.नव्या वर्षातील पहिल्या आठड्यापासून तापमानाचा पारा कमी झालेला दिसून आला़ या हंगामात आतापर्यंत तापमान मागील महिन्यात ११ तारखेला पारा ५ अंशापर्यंत पोहचल्याने धुळेकर गारठले होते. दिवसभर गरम कपडे घालूनच नागरिक घराबाहेर निघतांना दिसत होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काहीअंशी तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र दोन दिवसात अचानक ६.६ अंशावर वाढलेल्या थंडीने गरम कपड्यांची पुन्हा गरज निर्माण झाली. तापमानात होणाऱ्या या बदलाने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. विशेष: नवजात शिशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्यावर कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचा परिणामही बाल रुग्णांवर दिसू लागला आहे़ बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्याने या सर्वच आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला आहे. त्यांना डोस वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय असल्याचे देखील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे