शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे पं.स. सदस्य राजेंद्र पाटील यांनी कॉंग्रेस पक्षात केला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 14:40 IST

कापडणे : तालुक्यातील कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात ...

कापडणे : तालुक्यातील कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ताब्यात घेतलेली ग्रामपंचायत आणि अपक्ष पं.स.सदस्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश, त्यामुळे जि.प.गटात भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.पंचायत समितीच्या निवडणुकीत धुळे पंचायत समितीवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, भाजपच्या पं.स.वरील मनमानी कारभाराला शह देण्यासाठी कापडणेचे पं.स.गणाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. धुळे तालुक्यात आणि कापडणे जि.प., पं.स. गणात आमदारांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे गतीने सुरू आहेत. गटनेते काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणे पं.स.गणातील विकासासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांचा आमदार कुणाल पाटील यांनी स्वागत व सत्कार केला.दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कापडणे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या वंदनाबाई नवल पाटील, लताबाई आसाराम पाटील, हरिश पाटील, अंकिता अंजन पाटील, नीलेश जैन, उज्ज्वला बटू माळी, हिंमत चौधरी, सोनाबाई भिल, अक्काबाई भिल, जितू भिल, नाना भामरे, प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अश्‍विनी कुणाल पाटील, उद्योगपती शेखर पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, अशोक पाटील, सागर पाटील, सतीश बोरसे, दिलीप पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.