चारचाकीला इनबिल्ट जॅक, देवरे तंत्रनिकेतनचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:43 PM2019-04-03T18:43:48+5:302019-04-03T18:44:48+5:30

अतिशय कमी खर्चात ही सुविधा

Charchaki's Inbuilt Jack, Devre Polytechnic success | चारचाकीला इनबिल्ट जॅक, देवरे तंत्रनिकेतनचे यश

dhule

Next

धुळे : येथील बापुसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतनच्या आॅटोमोबाईल शाखेच्या तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या जयेश मनोज भावसार, प्रतिक चंद्रकांत कुरे, ललितसिंग राजपूत या विद्यार्थ्यांनी चारचाकीसाठी इनबिल्ट जॅक विकसित केले आहे़
तृतीय वर्ष तंत्रनिकेतनसाठी स्वत:ची कल्पना वापरुन एक प्रोजेक्ट तयार करावा लागतो़ या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखली़ सध्या महिला आणि वृध्द यांच्याकडून कारचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ गाडी चालवत असताना कार ही पंक्चर मोठ्या प्रमाणात होते़
अशा अडचणींच्या वेळेस वृध्द आणि महिलांना जॅक लावण्यात अडचण होते़ आधी जॅक लावायचा कसा, ठेवायचा कुठे, त्यानंतर जॅक वर करण्यासाठी होणारी कसरत वेगळी असते़
हीच गरज ओळखून जयेश मनोज भावसार, प्रतिक चंद्रकांत कुरे, ललितसिंग राजपूत या विद्यार्थ्यांनी आॅटोमॅटीक इनबिल्ट जॅकची संकल्पना सुचली़ चारचाकी वाहनाच्या प्रत्येक चाकाला एक असे चार हायड्रॉलिक जॅक बसविण्यात आले आहेत़
सदर जॅक खाली आणि वर करण्यासाठी वायपरची मोटार लावण्यात आली आहे़ अतिशय कमी खर्चात ही सुविधा तयार करण्यात आली आहे़ हेच तंत्रज्ञान भविष्यात अतिशय उपयोगी सिध्द होऊ शकेल असा विश्वास विद्यार्थ्यांना आहे़
या प्रोजेक्टसाठी बापुसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी़ बी़ कचवे, विभागप्रमुख तथा मार्गदर्शक एम़ बी़ बोरसे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले़ गुणवंत विद्यार्थ्यांचे आता सर्वत्र कौतूक होत आहे़

Web Title: Charchaki's Inbuilt Jack, Devre Polytechnic success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे